|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका

भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका 

 

 ऑनलाईन टीम / लंडन :  मी बुडवलेले बँकांचे पैसे परत घ्या, पण ब्रिटनच्या कोर्टात माझ्याविरोधात खटला चालविण्यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका, असं आवाहन मल्ल्याने ट्वटिद्वारे केलं आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांची बुडवलेली रक्कम परत करण्याची पुन्हा तयारी दाखवली आहे.

एसबीआयच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील समूह चुकीच्या पद्धतीने माझ्या मागे लागला आहे, असं सांगतानाच माझ्याविरोधात भारताने ब्रिटनमध्ये खटला दाखल केला आहे. करदात्यांच्या पैशांवर माझ्याविरोधात खटला लढवला जात आहे. भारतात माझ्याकडची सर्व थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. स्वतः पंतप्रधानांनी त्याचा खुलासा केला आहे, असं मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलंय.

 

Related posts: