|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हदरली

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हदरली 

ऑनलाईन टीम / कोलोंबो :

श्रीलंकेची राजधानी कोलंबोत साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर दीडशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे.

येथील 3 चर्च आणि 3 मोठय़ा हॉटेलांमध्ये एकूण 6 बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्यामध्ये शंभरहून अधिक नागरिक ठार झाले असून, दीडशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.  दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. हॉटेल शांग्रीला, हॉटेल किंग्सबरी आणि हॉटेल सिनामन या तीन हॉर्लटेसह सेंट एँथोनी, सेंट सेबास्टिन, सेंट बट्टीकलोआ या तीन चर्चमध्ये हे ब्लास्ट झाले. कोलंबोतील कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. कोलंबोच्या चर्चमध्ये या बॉम्बचा धमाका एवढा मोठा होता की त्यामुळे चर्चचे छत उडून गेले आहे.

Related posts: