|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा सिंगला निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञा सिंगला निवडणूक आयोगाची नोटीस 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

मुंबईचे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱया भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज बाबरी मशिद पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला नोटीस पाठविली आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांताराव यांनी सर्व राजकीय पक्षांना यापुढे अशी वक्तव्ये सुरु राहिल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

शहीद करकरेंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका होत असतानाच साध्वी यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी तिच्या छतावरच गेली नाही तर ती पाडण्यासाठीही प्रयत्न केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Related posts: