|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » येणाऱया काळात राहुल गांधी शेजारील देशातून निवडणूक लढवू शकतात  : पीयुष गोयल

येणाऱया काळात राहुल गांधी शेजारील देशातून निवडणूक लढवू शकतात  : पीयुष गोयल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही ठिकाणावरून निवडणूक लढवत आहेत. मात्र, यंदा ते दोन्ही भागातून निवडणूक राहुल गांधी यांचा पराभव होणार असून, त्यामुळे येणाऱया काळात राहुल गांधी शेजारील देशातून निवडणूक लढवू शकतात. अशी टिका केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. गोयल म्हणाले, अमेठीतून स्मृती ईराणी या राहुल गांधी यांचा पराभव करतील तर वायनाडमधून देखील काँग्रेस अध्यक्षांची हारच होणार आहे. त्यामुळे राहुल यांनी पुढील निवडणूक लढविण्यासाठी शेजारील राष्ट्रांची जागा शोधावी लागेल. वायनाडमध्ये राहुल गांधी यांना डाव्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. वायनाडमध्ये राहुल सीपीआई विरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहे. असे गोयल यांनी स्पष्ट केले.  

Related posts: