|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदान करा अन् 1 रुपये कमी दराने पेट्रोल मिळवा

मतदान करा अन् 1 रुपये कमी दराने पेट्रोल मिळवा 

प्रतिनिधी/   बेळगाव 

नागरिकांमध्ये मतदान जागृती व्हावी, यासाठी सरकारी पातळीवरून विविध प्रयत्न मागील महिनाभरापासून करण्यात येत आहेत. 100 टक्के मतदान करून देशाच्या भविष्याचे साथीदार क्हा, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये आता इतर संघ-संस्थाही सहभागी होत आहेत. मतदान केलेले दाखवा आणि प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपये सवलत मिळवा, असा अनोखा उपक्रम इंडियन ऑईलने राबविला आहे.

देशात तेल विक्रीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या इंडियन ऑईलने या मतदान जागृतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशाच्या प्रमुख शहरांमधील पेट्रोल पंपांवर मतदान जागृतीसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. मतदान केल्यानंतर   बोटावरची शाई दाखवून पेट्रोलच्या खरेदीवर प्रतिलिटर 1 रुपये सवलत मिळणार आहे.

मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत वाहनचालकांना ही सवलत मिळणार आहे. बेळगाव शहरातील इंडियन ऑईलच्या सर्व पेट्रोल पंपांवर ही सवलत मिळणार आहे. शहरात 20 हून अधिक इंडियन ऑईलचे पेट्रोल पंप आहेत. दिलेल्या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पेट्रोल पंपांवरही त्यासंबंधीचे फलक लावण्यात आले आहेत.

100 टक्के मतदान व्हावे, यासाठी सर्वच स्तरातून जागृती करण्यात येत आहे. सरकारबरोबरच टीव्ही कलाकार, क्रिकेटर मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. सिनेमागृहांमध्येही चित्रपट सुरू होण्यापूर्वी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दिवशी सुटी असल्याने नागरिक फिरण्याचा बेत आखतात, परंतु असे न करता देशाच्या भविष्याचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related posts: