|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » प्रसिद्धीसाठीच एनआयएमध्ये याचिका दाखल

प्रसिद्धीसाठीच एनआयएमध्ये याचिका दाखल 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  आजारपणाच्या कारणावरून दिशाभूल करून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज मालेगाव दंगलीतील पिडीताने येथील ‘एनआयए’ विशेष कोर्टात केला आहे. दरम्यान, यावर साध्वीने त्याला प्रसिद्धी हवी असल्याचा आरोप करत तसे उत्तर वकिलामार्फत न्यायालयाला दिले आहे.

उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेताना प्रज्ञासिंहनी आपणास स्तनाचा कर्करोग असून, आधाराशिवाय आपल्याला उभेही राहता येत नाही, असे म्हटले होते. साध्वी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला, हेच स्पष्ट होते, असा आरोप करून निस्सार अहमद सैयद बिलाल यांनी एनआयएच्या न्यायालयात अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असे म्हटले होते.