|Thursday, November 14, 2019
You are here: Home » क्रिडा » नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या राधिका महाजन, रुमा गायकैवारी, सई भोयार, शिवम कदमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या राधिका महाजन, रुमा गायकैवारी, सई भोयार, शिवम कदमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

ऑनलाईन टीम / पाचगणी :

रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिका महाजन, रुमा गायकैवारी, सई भोयार यांनी तर मुलांच्या गटात शिवम कदम याने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिका महाजनने महाराष्ट्राच्याच सोनल पाटीलचा 4-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सई भोयारने हषीता बांगेराचा 6-3, 4-6, 6-2 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या रुमा गायकैवारीने पश्चिम बंगालच्या  मेखला मन्नाचा  6-7(4),6-1, 6-4  असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवम कदमने गुजरातच्या धन्या शहाचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या सॉम चावलाने आसामच्या क्रितांता सर्माचा 6-3, 3-6, 6-2 तर गुजरातच्या अर्जुन कुंडूने आंध्र प्रदेशच्या अनंत मुनीचा 6-1, 4-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल–  उपउपांत्यपुर्व फेरी– 16 वर्षाखालील मुली

राधिका महाजन(महाराष्ट्र) वि.वि सोनल पाटील(महाराष्ट्र)4-6, 6-3, 6-2

सई भोयार(महाराषाट्र) वि.वि हषीता बांगेरा(महाराष्ट्र) 6-3, 4-6, 6-2

रुमा गायकैवारी(महाराष्ट्र)वि.वि. मेखला मन्ना(पश्चिम बंगाल) 6-7(4),6-1, 6-4

अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)वि.वि.  सुर्यांशी तन्वर (हरियाणा) 7-5, 6-2

अभया वेमुरी(तेलंगणा) वि.वि ईशीता जाधव(महाराष्ट्र) 6-4, 6-2

अपुर्वा वेमुरी(तेलंगणा) वि.वि दिया भारव्दाज(गुजरात) 6-3, 6-3

परी सिंग(हरियाणा) वि.वि सुहिता मरुरी(कर्नाटक) 6-2, 2-6, 6-0

लक्ष्मी अरूणकुमार(तमिळनाडू) वि.वि नागा रोशने(तमिळनाडू) 6-3, 6-3

उपउपांत्यपुर्व फेरी– 16 वर्षाखालील मुले 

अर्जुन कुंडू(गुजरात) वि.वि अनंत मुनी(आंध्र प्रदेश) 6-1, 4-6, 6-1

निथलियन इरिक(कर्नाटक) वि.वि करीम खान(महाराष्ट्र) 6-1, 6-2

अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक) वि.वि दिप मुनिम(मध्य प्रदेश)6-3, 6-2

शिवम कदम(महाराष्ट्र) वि.वि धन्या शहा(गुजरात) 6-1, 6-3

सॉम चावला(दिल्ली) वि.वि क्रितांता सर्मा(आसाम) 6-3, 3-6, 6-2

रोनित लोटलीकर(कर्नाटक) वि.वि कार्तिक सक्सेना(दिल्ली) 6-2, 6-3

अजय सिंग(छत्तीसगड) वि.वि यशराज दळवी(महाराष्ट्र) 6-1, 6-3

आयुष भट(कर्नाटक) वि.वि अनर्घ गांगुली(महाराष्ट्र)  6-4, 6-4

Related posts: