|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » चौथ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात

चौथ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा हा चौथा आणि शेवटचा टप्पा आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह 17 मतदारसंघांतील 323 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. अंदाजे 3 कोटी 11 लाख मतदार आज मतदान करणार आहेत. 10,073 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता या मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदारांना सायंकाळी 6 वाजेपर्यत येथे मतदान करता येणार आहे.

प्रशासनातर्फे मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014 साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या.

अभिनेते परेश रावल, प्रियंका चोप्रा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतून मतदान केले आहे.