|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » पंतप्रधानांनी राजकारणासाठी जातीचा वापर केला नाही : अरूण जेटली

पंतप्रधानांनी राजकारणासाठी जातीचा वापर केला नाही : अरूण जेटली 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बसप अध्यक्ष मायावतींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याचा आरोपांना केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी उत्तर दिले आहे. मोदींनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. असे ट्वीट अरूण जेटली यांनी केले आहे.

बसपाच्या नेत्या मायावती यांनी पंतप्रधान मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करून घेतल्याचा आरोप केला. त्यावर जेटली ट्वीट करून म्हणले, पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध आहे. त्यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही. त्यांनी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. असे जेटलींनी नमूद केले.

जातीचे नाव घेऊन जे लोक गरीबांना फसवत आहेत, त्यांना यश मिळणार नाही. जातीचे राजकाण करून त्यांनी फक्त पैसे कमावले आहेत. बसप किंवा राजद प्रमुखांच्या कुटुंबाकडील संपत्तीच्या प्रमाणात मोदींकडे 0.01 टक्के देखील संपत्ती नाही. असे देखील जेटली यांनी सांगितले.

Related posts: