|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » भाजप नगरसेवकाची मनसे कार्यकर्त्याला मारहाण

भाजप नगरसेवकाची मनसे कार्यकर्त्याला मारहाण 

ऑनलाईन टीम / पनवेल :

पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर 29 एप्रिलला जीवघेणा हल्ला केला. विजय चिपळेकर यांनी आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. मध्यरात्री 12 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात समोर येत आहे. 29 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर प्लॅनिंगने हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱया भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.