|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, राष्ट्रीय महामार्गावर 27 वाहने जाळली

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, राष्ट्रीय महामार्गावर 27 वाहने जाळली 

ऑनलाईन टीम / गडचिरोली :

गडचिरोली जिह्यात नक्षलवाद्यांनी मोठय़ा प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला. छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कुरखेडा तालुक्मयातील दादापूर येथे मध्यरात्रीपासून पहाटे 3.30 दरम्यान घडली.

पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 136 चे काम सुरू आहे. हे काम छत्तीसगडमधील दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट व दोन कार्यालयेही आहेत. तेथे रस्त्याच्या कामवरील अनेक वाहने होती. मध्यरात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी ठिकठिकाणी शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत 11 टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल 27 हून अधिक वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जाळली, अशी माहिती प्लांट अधिकाऱयाने दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.