|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाडेकरुवर गोळी झाडल्याप्रकरणी तिघांना जामीन मंजूर

भाडेकरुवर गोळी झाडल्याप्रकरणी तिघांना जामीन मंजूर 

प्रतिनिधी /मडगाव :

भाडेकरुवर गोळी झाडल्याचा आरोप असलेल्या सोनारवाडो – राय येथील तिघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना पीडित कुटूंबाकडे हस्तक्षेप न करण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार सोनारवाडा – राय येथील बाबल कवळेकर यांना मारहाण करणे तसेच बंदुकीतून गोळी झाडून जखमी केल्याप्रकरणी सोनारवाडा – राय येथील मारियो कॉता (56), मारिया कॉता (48) व राजेश शांतप्पा मराठे (40)  यांच्यावर आरोप होता.

अटकेच्या भितीने या तिघांनी न्यायालयात धाव घेतली असता आज 3 मेपासून एक आठवडाभर कुडतरी पोलीस स्थानकात सकाळच्या वेळी हजर राहावे, बाबल कुटूंबाकडे हस्तक्षेप करता कामा नये तसेच त्यांना धमकी देता कामा नये अशा न्यायालयाने अटी घातल्या आहेत.

कुडतरी पोलिसांच्यावतीने सरकारी वकील सुभाष देसाई यांनी न्यायालयात काम पाहिले.

 बाबल कवळेकर याचा खून करण्याचा प्रयत्न करणे, दुसऱयाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणे, अपशब्द वापरणे व जीवे मारण्याची धमकी देणे यासारख्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 307, 452, 504 व 506 (2) कलमाखाली वरील तिन्ही संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.

बाबल यांनी कुडतरी पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार 28 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला वरील तिन्ही संशयित बाबल राहात असलेल्या जागेत जबरदस्तीने घुसले व मारियो कॉता याने बाबलवर ऍरगनने गोळी झाडली. ही गोळी छातीच्या उजव्या बाजुला  बसल्याने बाबल जखमी झाला.

Related posts: