|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पिंपरीतून 150 किलो गांजा जप्त

पिंपरीतून 150 किलो गांजा जप्त 

पिंपरी / प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी तब्बल 150 किलो गांजा जप्त केला आहे. शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सोलापूर येथील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 35 लाख 88 हजार रुपये किंमतीचा 150 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

योगेश जोध, सागर कदम, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिटवाईज कंपनी परिसरात सापळा रचला. संशयित दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5 गोण्यांमध्ये 150 किलो गांजा आढळून आला.

Related posts: