|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » भारतीयाची गुंतवणुकीसाठी लंडन शहराला सर्वाधिक पसंती

भारतीयाची गुंतवणुकीसाठी लंडन शहराला सर्वाधिक पसंती 

मागील वर्षांत सर्वोच्च गुंतवणुकीत भारतीय कंपन्याचा समावेश

वृत्तसंस्था/ लंडन

भारतीय गुंतवणूकदारांसाठी ब्रिटनची राजधानी लंडन सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. यामध्ये मागील वर्षात भारतीय कंपन्याकडून करण्यात आलेल्या ग्ंाgतवणुकीत सर्वोच्च स्तर गाठला असल्याची माहिती एका विश्लेषकाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

लंडनचे महापौरचा प्रचार करणाऱया ऍड आणि पार्टनर  एजन्सीजकडून  नेंदविलेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये थेट विदेशी (एफडीआय) आकर्षित करण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या याजनेत ब्रिटनला सर्वाधिक म्हणजे 52 भारतीय एफडीआय जमा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱया बाजूला 51 परियोजनेसह अमेरिका आणि 32 परियोजनेसह सयुक्त अरब अमिराती यांनी स्थान मजबूत मिळलिले आहे. विश्लेषण करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे लंडन येथे करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यामध्ये 2018 पर्यंत 32 परियोजना सादर करण्यात आल्या आहेत.

भारतीय एफडीआयमध्ये वाढ

लंडन येथील भारतीय विदेशी गुंतवणुकीमध्ये 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 255 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण ब्रिटनमध्ये 2017 च्या बरोबरीत 2018 मध्ये 100 टक्क्यांनी अधिक वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. कारण 2018 मधील करण्यात आलेल्या एकूण गुंतवणुकीत लंडनमध्ये 60 टक्के हिस्सेदारी अधिक राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय विस्तार

भारतीय कंपन्यानी लंडनमध्ये आपली गुंतवणूक करण्यासाठी अगदी उत्साहाने निवड केली आहे. तर ही निवड मर्यादित स्वरुपाची नसून ती आंतरराष्ट्रीय विचार लक्षात घेऊनच झाल्याचे लंडन ऍड पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरा सिट्रन यांनी यावेळी सांगितले आहे.

Related posts: