|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » करणी सेनेची जावेद अख्तरांना धमकी

करणी सेनेची जावेद अख्तरांना धमकी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

श्रीलंकेत बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी करणारे गीतकार जावेद अख्तर यांनी तीन दिवसात माफी मागावी, अन्यथा घरात घुसून मारु, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी दिली आहे.

‘आपल्या मर्यादांना ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरे जावे’, असे करणी सेनेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. जावेद अख्तर यांनी श्रीलंकेत बुरख्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असे वक्तव्य केले होते.