|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » नोटबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा

नोटबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता योगगुरू रामदेव बाबा यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी नोटबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.

रामदेव बाबा म्हणाले होते की, बँकेवाले एवढे बेईमान असतील, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विचार केला नसेल. मला असं वाटते, बँकवाल्यांनी नोटबंदीत हजारो नव्हे तर लाखो कोटींची लूट केली. हा घोटाळा सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असेल, असंही रामदेव बाबा म्हणाले होते. या घोटाळय़ासाठी त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱयांवर बोट ठेवले होते. एका सिरीजच्या दोन नोटा मिळाल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा मोठा हल्ला आहे. नोटबंदीच्या वेळी कॅशची कमतरता नव्हती, परंतु ही संपूर्ण कॅश बेईमान लोकांना सोपविण्यात आली होती. त्यावेळी नोटांच्या वितरणात सुधरणा करणे आवश्यक होते, असंही रामदेव बाबा यांनी मुलाखतीत म्हटले होते.