|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सासऱयाला मारहाण प्रकरणी सुनेसह दोघांना अटक

सासऱयाला मारहाण प्रकरणी सुनेसह दोघांना अटक 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरातील राजीवडा येथे राहणाऱया सासऱयाला मारहाण केल्याप्रकरणी सुनेसह तिच्या आई-वडीलांना शहर पोलिसांनी अटक केली आह़े  रूक्सार शाहरूख कोतवडेकर तिचे वडील सऊद अब्बास वस्ता व आई जलीना सऊद वस्ता (सर्व ऱा राजीवडा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़  शनिवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आह़े

   याप्रकरणी कुलसुंब जलील कोतवडेकर यांनी आपल्या पतीला मारहाण झाल्याबबतची तक्रार दाखल केली होती त्यानुसार 24 एप्रिल रोजी रात्री संशयित आरोपी रूक्सार ही तिचा पती शाहरूख याच्यासोबत नजीकच असलेल्या माहेरी गेली होत़ी त्याठिकाणाहून ते दोघे आपल्या घरी परत आल़े यावेळी तिचे सासरे जलील कोतवडेकर यांनी मुलगा व सुनेला माहेरी जेवण करून आल्याचा जाब विचारल़ा   

   याचा राग येवून रूक्सार हिचे आईवडील यांनी त्याठिकाणी येवून तक्रारदार व तिच्या पतीशी वाद घालण्यास सुरूवात केल़ी याचा राग येवून संशयित आरोपी यांनी तक्रारदार यांच्या पतीला धक्काबुक्की केली तसेच सून रूक्सार हिने प्लास्टिक  खूर्ची डोक्यात मारून जलील यांना दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.