|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » लिंबांच्या दरामध्ये वाढ

लिंबांच्या दरामध्ये वाढ 

 

 ऑनलाईन टीम / पिंपरी :  मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णाताही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. परिणामी बाजारात लिंबूची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरामध्ये मोठय़ प्रमाणात वाढ झाली आहे. एरव्ही घाऊक बाजारात 70 ते 80 रुपये शेकडा यादराने विकले जाणारे लिंबू सध्या 300 ते 400 रुपये शेकडा या दराने विकले जात आहे. मागच्या दोन महिन्यात दुसऱयांदा लिंबाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, किरकोळ बाजारातही नागरीकांना आता 10 रुपयाला 3 या दराने लिंबू विकत घ्यावे लागत आहेत.

पुणेसह पिंपरी-चिंचवड शहरातील घाऊक बाजारात आंध्र प्रदेशमधून मोठय़ प्रमाणात लिंबू येत असतात. त्यापाठोपाठ नगर जिह्यातूनही लिंबाच्या गाड्यांची आवक होत असते. मात्र, यावषी दुष्काळी परिस्थिती तसेच इतर कारणामुळे लिंबाची आवक मोठय़ प्रमाणात घटली आहे. त्यातच सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने हॉटेल तसेच घरगुती वापरासाठीही लिंबूची मागणी वाढली आहे. शिवाय शाकाहारी असो किवा मांसाहारी, लिंबाची आवश्‍³ाकता रोजच्या जेवणात भासतेच. त्यामुळे, लिंबूला बाजारात मागणी आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना एका लिंबूसाठी तीन ते चार रुपये मोजावे लागत आहेत. तर घाऊक बाजारामध्येही लिंबाच्या दरामध्ये मार्च महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.

मार्च महिन्याच्या आगोदर घाऊक बाजारात 70 ते 80 रुपये शेकडा असलेला लिंबाचा दर मार्च-एप्रिल महिन्यात 150 ते 200 रुपये शेकड्यावर पोहचला होता. आता हाच दर मे महिन्यात 300 ते 400 रुपये शेकडा झाला आहे. त्यामुळे, लिंबाचे वाढलेले भाव व्यावसायीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उन्हाळा संपेपर्यंत लिंबाचे दर असेच चढे राहतील, अशी माहिती लिंबाच्या व्यापाऱयांनी दिली आहे.