|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा सरकारी संकेतस्थळावर अधिकृत विभाग निर्देशिकेत चुकीची माहिती

गोवा सरकारी संकेतस्थळावर अधिकृत विभाग निर्देशिकेत चुकीची माहिती 

पणजी :

गोवा सरकारच्या www.goa.gov.in या संकेतस्थळावर गोवा सरकारी विभाग व कार्यालयांच्या अधिकाऱयांचे संपर्क क्रमांक अधिकृत विभाग निर्देशिका (डिपार्टमेंट डिरेक्टरी) यावर उपलब्ध असतात. जनतेसाठी हे संपर्क वेळोवेळी अद्ययावत (अपडेट) करण्याची गरज असते पण ती अद्ययावात करण्यात आलेली नाही. यावर विभागाचे संचालक, अध्यक्ष व इतर अधिकाऱयांची चुकीची माहिती आज उपलब्ध आहे. संकेतस्थळ रोज अद्ययावात होऊनही सदर विभागाच्या अधिकाऱयांची नावे अद्ययावात होत नाही. सरकारी कर्मचारी नेमके कुठल्या कामात व्यस्त असतात की त्यांना ही नावे अद्ययावत करण्यासाठी वेळ नाही असे प्रश्न गोमंतकीयांकडून करण्यात येत आहे.

या विभाग निर्देशिका अधिकाऱयांची बदली झाल्यावर लगेच अद्ययावत करण्याची गरज असते पण तसे पाऊल सदर विभागाने उचलल्याचे दिसून येत नाही. https://www.goa.gov.in/citizen/department-directory/?undefined&dept  या संकेतस्थळाला आपण भेट दिली तर विविध विभागांच्या मुख्य अधिकारी, संचालक, अध्यक्षांची माहिती संपर्कासहीत जनतेसाठी निर्देशिकेमध्ये उपलब्ध असते. महिन्यांनी किंवा वर्षांनी या अधिकाऱयांची बदली झाल्यावर ती लगेच अद्ययावत केली पाहीजे. सरकारी कर्मचाऱयांना कुणी जाप विचारणारे नाही अशा पद्धतीची टीकाही जनतेकडून केली जात आहे.

Related posts: