|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती

घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती 

ऑनलाईन टीम / सातारा :

घडय़ाळाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिले गेल्याचे मी प्रत्यक्ष डोळय़ाने पाहिले असल्याचे स्पष्ट करीत ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे.

साताऱयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हैदराबाद आणि गुजरात या राज्यातील काही ईव्हीएम मशीन माझ्यासमोर ठेऊन मला बटण दाबण्यास सांगितले असता मी घडय़ाळासमोरचे बटण दाबले. मात्र, प्रत्यक्षात मत कमळाला गेले. हा प्रकार मी माझ्या डोळय़ाने पाहिला आहे. त्यामुळे आपल्या एकूणच इव्हीएमबाबत चिंता वाटते.