|Monday, December 9, 2019
You are here: Home » मनोरंजन » इतिहासाच्या सुवर्ण पानात दडलेली पहिली सर्जिकल स्ट्राईक… ‘फत्तेशिकस्त’

इतिहासाच्या सुवर्ण पानात दडलेली पहिली सर्जिकल स्ट्राईक… ‘फत्तेशिकस्त’ 

‘फर्जंद’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातले एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून आकारास आलेल्या ‘फर्जंद’ने  तिकीटबारीचे मैदान मारत हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवली होती. ‘फर्जंद’नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल.

कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्राrय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठय़ा चलाखीने चढाया करून प्रत्येक मोहीम फत्ते केली. ‘आलमंड्स क्रिएशन्स’ प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळेमुळे ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

मफणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मफण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तफप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Related posts: