|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पत्नीच्या खुनातील पतीसह आठजण दोषी

पत्नीच्या खुनातील पतीसह आठजण दोषी 

प्रतिनिधी/ सोलापूर

अनैsितक संबंधास अडसर ठरणाऱया पत्नीचा पेयसी आणि इतर साथीदारांच्या मदतीने कट रचून खून केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी सोमवारी दोषी ठरविले असून बुधवार 15 मे  रोजी आरोंपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

पती नरहरी रामदास श्रीमल (वय 34 रा. श्रीराम नगर,सोलापूर), प्रेयसी विनोदा नागनाथ संदुपटला (वय 33, रा. विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर), महोदवी बसवराज होनराव (वय 35, रा. विडी घरकुल, कुंभारी,सोलापूर), अंबुबाई भिमनाव कनकी (वय 38, रा. विडी घरकुल, कुंभारी,सोलापूर) बालाजी दत्तात्रय दुस्सा (वय 23, रा. विनायक नगर,सोलापूर), अमर श्रीनिवास वंगारी (वय 25, रा. विडी घरकुल, कुंभारी,सोलापूर), नरेश अंबादास मंत्री (वय 22, रा. विनायक नगर, सोलापूर), अंबादास किसन ओत्तुर (वय 21, रा. विनायक नगर,सोलापूर) आदींना खुनाचा कट रचल्याच्या व पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आले आहे. तर प्रवलिका उर्फ सोनी नरहरी श्रीमल असे गळा दाबून खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्रवलिका यांचा पती नरहरी आणि विनोदा संदुपटला या दोघांचे असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती प्रवलिका यांना समजली होती. याबाबत प्रवलिका यांनी माहेरी माहिती दिली होती. त्याकारणावरुन प्रवलिका आणि नरहरी यांच्यात नेहमीच वाद होता. यातून आरोपी नरहरी आणि त्याची प्रेयसी विनोदा यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने प्रवलिका यांना संपवण्याचा कट रचला. त्यानुसार 12 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास नरहरी याने प्रवलिका यांना देवकार्याच्या निमित्ताने अंबुबाईच्या घरी नेले. त्यानंतर अगोदरच असलेल्या इतर आरोपींनी प्रवलिका यांना मारहाण करुन, गळा आवळून त्यांचा खून केला. दुसऱया दिवशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्शाने आरोपी विनोदा हिच्या घरी टेम्पोतून प्रवलिका यांचा मृतदेह खड्डा करुन पुरण्यात आला होता.

याप्रकरणी व्यंकटेश काशिनाथ वडनाल (वय 42, रा. सोलापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न व कट रचल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुह्याचा तपास करुन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे 20 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, वैद्यकीय पुरावा ग्रहित धरुन आरोपी नरहरी रामदास श्रीमल विनोदा नागनाथ संदुपटला, महोदवी बसवराज होनराव , अंबुबाई भिमनाव कनकी आदी आरोपींना खुनाचा कट रचून खून करणे व पुरावा नष्ट करण्याच्या कलमाखाली तर बालाजी दत्तात्रय दुस्सा, अमर श्रीनिवास वंगारी, नरेश अंबादास मंत्री, अंबादास किसन ओत्तुर यांना खुनाचा कट रचणे व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले. 

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत, आरोपींच्या वतीने  ऍड. एम. आय. कुरापाटी, ऍड. ए. ए. ईटकर  ऍड. ए. एन. शेख यांनी काम पाहिले.

Related posts: