|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » अशियाई देशांचा जीडीपी 7 टक्क्यांवर शक्य

अशियाई देशांचा जीडीपी 7 टक्क्यांवर शक्य 

भारतासह अन्य देशांचा समावेश : ब्लूमबर्ग चार्टड बँकेच्या मदतीने अहवाल

वॉशिग्टन :

 आगामी एका दशकातील प्रवासात भारतासह अन्य आशियातील देशाचा विकास दर 7 टक्के मिळवतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या प्रवासात चीनचा समावेश नसणार आहे. अशी माहिती एका अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. सदरच्या अहवालात 2020 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्क्यावर राहणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

इथिओपिया आणि कोटे डी आवोरेचा विकासदर

येणाऱया दशकात जगातील सात देश आपला विकास 7 टक्के या वेगाने करणार आहेत. परंतु यात आशियातील पाच अर्थव्यवस्था या सर्वात वेगाने प्रवास करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये भारत, बांग्लादेश, व्हीएतनाम, म्यानमार, आणि फिलिपाइन्स आदी देशांचा समावेश करण्यात आला आहे. तर अन्य देशामध्ये आफ्रिका आणि इथीओपिया आणि कोटे डी आवोरे यांचाही समावेश होण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. 

विकासदर वाढ व सुधारणा

सर्व देशांचा आर्थिक विकासदर(जीडीपी) वेगाने वाढणार आहे. याचे कारण शिक्षण आणि आरोग्य या विषयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर विकासदर वाढल्याने उत्पादनाला फायदा होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. यांच्यामधून समाजातील सामाजिक आणि राजकीय स्तरावरील असमानता दूर होण्यास मदत मिळणार आहे. तर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी वाव मिळण्याचे ब्लूमबर्ग यांच्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनचा विकासदर 5.5 टक्के राहण्याचा अंदाज

चीनचा विकासदर आगामी काळात 5.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारण मागील चार दशकात चीनचा या यादीत समावेश झालेला आहे. परंतु आर्थिक मंदीच्या कारणामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 2017 मध्ये चीनचा विकासदर 6.8  टक्के होता. तर या तुलनेत 2018 ला हा दर 6.6 वर राहिला आहे.