|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » शोओमीने फोन व्हेंडिंग मशीन सादर केले

शोओमीने फोन व्हेंडिंग मशीन सादर केले 

कोल्डडिंकप्रमाणे होणार स्मार्टफोनची खरेदी

बेंगळूर

 शाओमी इंडियाने सोमवारी बेंगळूर येथे स्मार्टफोन वेंडिंग मशीनचे लाँचिंग केले आहे. या मशीनच्या आधारे फोन आणि ऍक्सेसरीजची खरेदी करता येणार आहे. या मशीनला एमआय एक्स्प्रेस कियोस्क असे नाव दिले आहे. या प्रकारच्या अन्य मशीनची देशातील अन्य शहरात उभारण्यात येणार आहे. या प्रकारची मशीनची उभारणी शॉपिग मॉल्स, एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, टेक्निकल पार्क या ठिकाणावर  करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कारण अशा ठिकाणावर अनेक ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदीकरीता येत असतात. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि कॅश पेमेन्ट आदी सुविधा देण्यात येणार आहे. सध्या भारतीय बाजारात स्मार्टफोनमधील प्रथम स्थानावर शोओमी पंपनी असल्याचा ही उल्लेख केला आहे.