|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस लाँचिंग

बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस लाँचिंग 

नवी दिल्ली

 : बीएमडब्ल्यूने भारतात नवीन दुचाकी ‘बीएमडब्ल्यू एफ  850 जीएस ऍडव्हेंचर’चे लाँचिंग केले आहे. या ऍडव्हेचर दुचाकीची एक्स शोरुम किंमत 15.40 लाख रुपये आहे. या दुचाकीला मागील वर्षात इटली येथील मिलान शहरात भरविण्यात आलेल्या इआयसीएमए मोटार शोमध्ये या दुचाकीला सादर करण्यात आले होते. मंगळवारी लाँचिंगसोबत बीएमडब्ल्यूने कंपनीच्या एजन्टकडे गाडीचे बुकिंग करण्यासाठीची सुविधा सुरु केली आहे.

या दुचाकीचा पेहराव क्लासिक  ऍडव्हेचर टूर यासारखा आहे. दुचाकीला पुढच्या बाजूला 21 इंच आणि रियरमध्ये 17 इंचाच्या क्रॉस स्पोक व्हील दिले आहे.तर अन्य सुविधामध्ये हायमाउन्टेड एग्जॉस्ट आणि फ्रन्ट व्हील व स्पोक पर गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. या दुचाकीला फ्यूल टॅक 23 लिटरचा देण्यात आला आहे. व स्टॅन्डर्ड एफ 850 जीएसपेक्षा 8 लिटर अधिक आहे. क्रॅश प्रोटेक्शन लॅस असून त्यांचे वजन 244 किलोग्रॅम इतके आहे.

सर्वात महागडय़ा पाच दुचाकी

एफ 850 जीएस ऍडव्हेचरमध्ये एलईडी हेडलाईट्स, अजस्टेबल विंड स्क्रीन, अजस्टेबल रियर ब्रेक आणि गिअर लीवर्स, बॅश प्लेट आणि नकल गार्डस देण्यात आले आहेत. या दुचाकीत 6.5 इंचाची टीएफटी डिस्प्ले असून याला स्मार्टफोन जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

क्षमता

बीएमडब्ल्यूची ऍडव्हेंचर दुचाकीला 853सीसी इन-लाइन, पॅरलल-ट्विन इंजीन आहे. जो स्टॅन्डर्ड बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस ला देण्यात आले आहे. तर सदर  इंजीनची क्षमता 8,250 आरपीएम वर 95 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकेल आणि 6,250 आरपीएम वर 92 एनएम टॉर्क जनरेट करता येणार आहे.  सर्वोच्च वेग 197 किलोमीटर प्रतितास राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.