|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » अखेरपर्यंत लढत राहू : चीन

अखेरपर्यंत लढत राहू : चीन 

ट्रम्प यांच्या धमकीवर प्रत्युत्तर : दुर्बल मानू नका

बीजिंग :

 व्यापारयुद्धात आम्हाला ‘दुर्बल समजू नका’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देत चीनने अखेरपर्यंत लढण्यास समर्थ असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी चीनकडून आयात होणाऱया 200 अब्ज डॉलर्सच्या साम्रगीवरील शुल्क 25 टक्के केले आहे. चीनकडून आयात होणाऱया उर्वरित सामग्रीवरील शुल्क वाढविण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. चीननेही प्रत्युत्तरादाखल 50 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकेच्या सामग्रीवरील शुल्क वाढविले आहे.

अमेरिकेने मागील वर्षी चीनकडून 539 अब्ज डॉलर्सच्या सामग्रीची आयात केली होती. तर चीनला अमेरिकेकडून झालेली निर्यात केवळ 120 अब्ज डॉलर्स होती. शुल्क वाढवल्याने समस्या सुटणार नाही. व्यापारयुद्ध सुरू केल्याने स्वतःला तसेच इतरांनाही नुकसानच होते असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्त जेंग शुआंग यांनी मंगळवारी म्हटले आहे.

चीन झुकणार नाही

चीन व्यापारयुद्धाची इच्छा बाळगत आही पण आम्हाला याबद्दल कुठल्याही प्रकारचे भय देखील नाही. कुणी आमच्यावर युद्ध लादल्यास आम्ही अखेरपर्यंत लढू. आम्ही कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही असे शुआंग म्हणाले. 11 व्या टप्प्यातील चर्चेनंतर दोन्ही देश चर्चा सुरू ठेवण्यास सहमत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.