|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » करडवाडी येथे घरांवर वाळवीप्रतिबंधक औषधांची फवारणी

करडवाडी येथे घरांवर वाळवीप्रतिबंधक औषधांची फवारणी 

 

प्रकाश खतकर/ करडवाडी

भुदरगड तालुक्यातील अनेक गावठाण आणि वाडय़ांमधील घरांना सध्या वाळवी लागल्याने पिकांवर फिरवणारा पंप आता घरांवर फिरवण्याची वेळ आल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील करडवाडी, निष्णप, पारदेवाडी आदी दुर्गम भागातील वाडी-वस्तीवरील घरांना, झाडाना, गावताना व तोडलेल्या लाकडांना अनेक गावठान भागात सध्या वाळवी लागल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक प्रतिबंधक औषध फवारणी करताना या गरिबांच्या खिशाला परवडत नसून ऊस बिले, कर्ज माफी न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हातबल झाला आहे.

शेत-शिवारात अनेक शेतकऱयांनी जनावरासाठी गोठा वजा घरे बांधली आहेत.  माञ या घरांसाठी वापरण्यात आलेले लाकूड पूर्णतः वाळविणे पोखरून जीर्ण केले आहे. परिणामी अनेक घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. तर शेतामध्ये उभी असणारी झाडे देखील वाळवीच्या मातीने लिपली आहेत. याबाबत पारदेवाडी येथील गवंडी पांडुरंग सुतार यांच्या माहिती प्रमाणे असे ऐकण्यास मिळाले की वाळवी रंगाने पांढरट-पिवळसर असते. दिसायला मुंगीसारखीच असली तरी त्यांच्या पोटाचा भाग रूंद तर त्यांचा जबडा मोठा असतो.

तोंडाजवळ दोन तुरे किंवा मिशा असतात. तुऱयाजवळच त्यांना विंचवाप्रमाणे दोन अणकुचीदार नांग्या असतात. या नांग्यांच्या साहाय्याने लाकूड, झाड, फर्निचर किंवा सिमेंटचा फडशा पाडण्याचं काम वाळवी करते. घरांचे रुपकाम करताना वळवीस बळी पडणाऱया लाकडांची बॅटन किंवा रिपा वापरू नये. तर सिसव, सागवान आदी लाकूड वापरावे. जाडजुड भिंतीसुद्धा वाळवी फोडू शकत असल्यामुळे मानवाचंही ती प्रचंड नुकसान करते. सध्या राहत्या घरांना देखील प्रचंड प्रमाणात वाळवी लागल्याने पावसाळ्यापूर्वी खापरी काढून नव्याने रूपकाम करण्याची वेळ शेतकऱयांवर येत आहे. जास्त करून अंधारं किंवा ओलसर वातावरण वाळवींना पोषक असते. या वस्ती करून राहतात. कारण एकत्र राहिल्यानेच त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता आणि आद्र्ता टिकवणं शक्य असतं. म्हणूनच त्यांचं समूळ उच्चाटन करणं कठीण असतं. एका वस्तीत दहा लक्ष इतक्या प्रचंड संख्येने त्या एकत्र राहतात.

मुंग्यांप्रमाणेच त्यांचे ‘कामकरी’, ‘सैनिकी’, ‘राणी’ असे प्रकार आहेत. त्यांच्या वस्तीच्या रक्षणाची जबाबदारी ही सैनिकी वाळवीवर असते तर वस्तीतील वाळवींची काळजी घेणे, अन्न जमा करणे ही कामे कामकरी वाळवी करते. लाकडातील पिष्टमय पदार्थ, जंतू, विष्टा आणि मृत वाळवी हे त्यांचं अन्न असते. राणी वाळवीची प्रजनन क्षमता प्रचंड असते. समूळ उच्चाटन न होणारी वाळवी घरात होऊच नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी.

घराची सतत स्वच्छता आवश्यक आहे. घरांत लाकडाचा साठा करून ठेवू नये. त्यामुळे वाळवी लागण्याची शक्यता अधिक असते. काहीजण प्रथमोपचार म्हणून  रॉकेल फवारतात. मात्र वाळवी आद्रतेकडे अधिक आकर्षित होत असल्याने घरात हवा खेळती कशी राहील याचा प्रामुख्याने विचार करून तशी रचना करावी. त्यातील राणी वाळवीला किंवा नर वाळवीला मारल्यानेच वाळवीला समूळ नष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.