|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाचणीच्या दिशा ऍकॅडमीच्या मुलांचा ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम

बाचणीच्या दिशा ऍकॅडमीच्या मुलांचा ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम 

आदिवासी मुलांचे सुरेल गायन, वादनाचे सादरीकरण

वार्ताहर / व्हनाळी

बाचणी (ता. कागल) येथील  दिशा ऍकॅडमीच्या  आदिवासी मुलांनी ऑल इंडिया रेडिओवर सादर केलेल्या सुरेल  गीत, गायन नाटीका अशा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने ऐकणाऱया प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्घ केले. 

मानवामध्ये प्रज्ञा आणि प्रतिभा ही कोठे अन् कुणा जवळही असु शकते. याची प्रचिती नुकतीच ऑल इंडीया रेडीओवर प्रस्तुत दिशा ऍकॅडमीच्या आदिवासी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आली. सुरेल आवाज, सुस्पष्ट उच्चारातील सादरीकरणाने ऐकणाऱयांना तल्लीन  केले.

बाचणी ता.कागल येथील दिशा ऍकॅडमी या संस्थेच्या साई दिशा पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) या निवासी शाळेत गतवर्षी शंभर मुले-मुली सहभागी झाली आहेत. सुरवातीला बुजरी वाटणारी, भिडस्त स्वभावाची मुले, मुली दिशा ऍकॅडमी चे संस्थापक प्रा. अजित पाटील व प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच मुळ प्रवाहात आली व त्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षणीय           प्रगती केली आहे याचे श्रेय दिशा ऍकॅडमीच्या प्रशासनाला जाते.