|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लवकरच रोजगार निर्मिती

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लवकरच रोजगार निर्मिती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  

सराकार आगामी काळात पर्यावरण आणि उपलब्ध होणारे खनिज तेल यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने 2020 पर्यंत देशातील रस्त्यावर 60 ते 70 लाख इलेक्ट्रिक वाहने उतरणार आहेत. आणि 2030 पर्यंत एकूण वाहनांची संख्या 30 टक्क्यांवर पोहोचविण्याचे ध्येय असल्याचे निश्चित केले आहे. या करीत सरकारने 2013 मध्येच यासाठी पूर्व योजना आखली आहे.

देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी या योजनेला चांगले दिवस यावेत यासाठी एका विशिष्ट योजनेची तयारी करण्यात आली आहे. यातून जवळपास 1 कोटी रोजगार निर्माण होण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय इलेक्ट्रिक यांच्याकडून वाहन उद्योगाला आवश्यक असणारी कर्मचाऱयांची होणाऱया मागणीची योजना उभारत असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

विविध क्षेत्रांचा समावेश

सदरचा रोजगार हा इलेक्ट्रिक वाहनाचा विशेष तज्ञ लोकांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात डिझायनिंग, टेस्टींग, बॅटरीची निर्मिती, व्यवस्थापन, विक्रीची सेवा आणि अन्य पायाभूत क्षेत्रांमध्ये रोजगारांची निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. या बरोबरच ऑटोमोटिव्ह योजना 2026 पर्यंत ऑटो क्षेत्रात आणणार असून त्यात अतिरिक्त 6.50 कोटी रोजगाराची दारे उघडण्याचे संकेत मांडण्यात आले आहेत.