|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » आयटी फायनान्स-बँकिंगच्या कामगिरीने चमक

आयटी फायनान्स-बँकिंगच्या कामगिरीने चमक 

वृत्तसंस्था /मुंबई :

मागील अकरा सत्रांमध्ये मुंबई शेअर बाजाजारात दबावासह घसरणीचे आाrण एकदा तेजीचे वातावरण राहिले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवारच्या सत्रानंतर गुरुवारी मुंबई शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याची नोंद करण्यात आली. यात मुख्य क्षेत्रातील आयटी आणि फायनान्स यांच्यातील समाधानकारक कामगिरीने बाजार सावरला. बीएसई सेन्सेक्स 278.60 अंकानी मजबूत होत 37,393.48 वर वधारत बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 100 अंकानी वधारत 11,257.10 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाचा भडका उडाला असल्याचे दिसून येत आहे. यांच कारणांमुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या अमेरिकेने चिनी उत्पादनावर आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत गेल्या 10 मेपासून वाढ केली आहे. तर चीन अमेरिकेच्या उत्पादनावर 1 जून 2019पासून अधिकचे आयात शुल्क लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. या वातावरणाचा परिणाम नफा कमाईवर होणार का? अन्य शेअर बाजार दबावात राहतील का अशा अनेक घटनांची उकल येणाऱया काळातच होणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

दिवसभरतील व्यवहारात मुंबई बाजारात बजाज फायनान्स 3.64 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले. तर कंपनीच्या नफ्यात तिमाही नफा कमाईच्या आकडेवारीचा फायदा झाल्याची नेंद करण्यात आली. या कंपनीसह अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, इन्फोसिस, वेदान्ता, ओएनजीसी, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक, टाटा स्टील, टीसीएस, आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स 3.48 टक्क्यांनी तेजीत राहिलेत. घसरणीत येस बँक सर्वाच्च स्थानी राहिली असून बँकेचे शेअर्स 4.07 टक्क्यांनी कमजोर झालेत. तर भारती एअरटेल, इंडसइंड बँक, कोल इंडिया, आयटीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि एशियन पेन्टस यांचे शेअर्स 1.87 टक्क्यांनी घसरल्याची नोंद करण्यात आली.