|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातून यावर्षी काजू बीची निर्यात घटली

जिल्हय़ातून यावर्षी काजू बीची निर्यात घटली 

रत्नागिरी  /प्रतिनिधी :

जिल्हय़ात यावर्षी काजूचे उत्पादन कमी असताना अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत काजू बीची परजिह्यात निर्यात करण्यासाठी शेतकऱयांचा थंडा प्रतिसाद लाभला आहे. गतवर्षी 2018 मध्ये एप्रिलअखेर 5 हजार टन काजू बीची निर्यात रत्नागिरी जिल्हय़ातून करण्यात आली होती. मात्र यावर्षी 2019 मध्ये हवामानातील बदलामुळे केवळ 543 टन काजूची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

  जिह्यातील 91 हजार 530 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी 83 हजार 292 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यंदाच्या वर्षी काजूचे उत्पादन कमी असतानाही काजूला तितकासा दरदेखील नाही. गतवर्षी 2018 काजूने सर्वोच्च (170 रूपये किलो) दर गाठला होता. मात्र, यावर्षी 2019 मध्ये हा दर 90 ते 120 रूपयांपर्यंतच राहिला आहे. काजूचे उत्पादन कमी असताना दरदेखील नाही. अशा परिस्थितीत काजू बीची परजिह्यात निर्यात करण्यासाठी शेतकऱयांचा मिळणारा प्रतिसाद थंड आहे. गतवर्षी एप्रिलअखेर 5 हजार टन काजू बीची निर्यात करण्यात आली होती. मात्र यावर्षी 543 टन काजूची निर्यात करण्यात आली आहे.

  यावर्षी हवामानातील बदलामुळे काजूचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे निर्यातही मंदावली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या अखेरिस केवळ 10 टक्केच काजूची निर्यात झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिह्यातून गोवा, चंदगड, नाशिक यासंह अन्य जिह्यात काजू बी पाठवण्यात येते. तेथील उद्योजक रत्नागिरीत येऊन मालाची खरेदी करतात. दरवर्षी काजूची निर्यात मोठय़ा प्रमाणात होते. यंदा मात्र हवामानातील बदलामुळे काजूचे उत्पादन कमी झाले आहे. सुरुवातीच्या काळात आलेला मोहर करपून गेला. त्यामुळे फळधारणा झालेली नाही. यामुळे यंदा कमी काजू उत्पादित झाला आहे.