|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अभिज्ञा पाटीलचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक

अभिज्ञा पाटीलचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक 

आष्टा :

मालेवाडी (ता.वाळवा) येथील बी.बी.पाटील यांची नात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सुवर्ण कन्या कुमारी अभिज्ञा अशोक पाटील रा.तळसंदे ता.हातकणंगले, जर्मनी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शुटिंग मध्ये रौप्यपदक पटकाविले. तिने 25 मीटर स्पोर्ट पिस्टल प्रकारात सहभाग घेतला होता.  या स्पर्धेमध्ये 600 पैकी 576 गुणांचा अचूक वेध साधत प्रथम क्रमांकाने पात्रता फेरीत प्रवेश केला होता. अंतिम स्पर्धा पहिल्या आठ खेळाडू दरम्यान झाली. अंतिम स्पर्धा फबीन सारा (हंगेरी), कॅन्डल इलीसा (फ्रान्स), मोरेल के (जर्मनी), इंना( युक्रिया), इरीना (कजाकिस्तान), कोमा रोमी पन्ना (हंगेरी), साराह (जर्मनी )यांच्यात झाली. अंतिम स्पर्धेत 27 गुण मिळवून अभिज्ञाने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती फबीन सारा (हंगेरी) व कास्य पदक विजेती कॅन्डल इलीसा(फ्रान्स) यांच्यावर कडवी झुंज देत अभिज्ञाने रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

     4 मे ते 12 मे 2019 यादरम्यान हॅनओहर (जर्मनी) येथे शूटिंग रेंजवर या नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशामुळे तिला दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला मिळणार आहे. एक म्हणजे 12 जुलै  ते 20 जुलै 2019 या दरम्यान सूल (जर्मनी) याठिकाणी आंतरराष्ट्रीय जुनियर गटातील वर्ल्ड कप स्पर्धा 2019 आणि दुसरे म्हणजे 7 ते 11 ऑगस्ट 2019 या दरम्यान होणाऱया 29 वी मीटिंग ऑफ शूटिंग होपस चेक रिपब्लिकन देशात होणाऱया आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिला सहभागाची संधी मिळणार आहे.