|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडरर , नदाल तिसऱया फेरीत दाखल

फेडरर , नदाल तिसऱया फेरीत दाखल 

वृत्तसंस्था /रोम :

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्विसचा तृतीय मानांकित रॉजर फेडरर तसेच स्पेनचा माजी विजेता आणि माजी टॉप सीडेड राफेल नदाल यांनी एकेरीच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

बुधवारी या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या दुसऱया सामन्यात रॉजर फेडररने पोर्तुगालच्या सोसाचा 6-4, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. फेडररचा तिसऱया फेरीतील सामना क्रोएशियाच्या कोरिकबरोबर होणार आहे. फेडररने या स्पर्धेत आतापर्यंत चारवेळा उपांत्य फेरी गाठली आहे. बुधवारी पावसामुळे  काही सामने रद्द करावे लागले होते. दुसऱया फेरीच्या अन्य एका सामन्यात स्पेनच्या माजी विजेत्या रॉफेल नदालने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर 6-0, 6-1 अशी एकतर्फी मात केली. या सामन्यात नदालने केवळ एक गेम गमविला. नदालने यापूर्वी ही स्पर्धा आठवेळा जिंकली असून पुढील फेरीत त्याची लढत जॉर्जियाच्या बॅसिलासेव्हेली बरोबर होणार आहे.