|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मंजूर चारा छावण्या येत्या 3 दिवसात सुरु करा

मंजूर चारा छावण्या येत्या 3 दिवसात सुरु करा 

पालकमंत्री विजय शिवतारेंच्या प्रशासन अधिकाऱयांना सूचना

प्रतिनिधी/ सातारा

माण तालुक्यातील चारा छावण्यांना मंजूरी असूनसुध्दा छावण्या सुरु झालेल्या नाहीत. त्या चारा छावण्या येत्या 3 दिवसात सुरु करा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिल्या.

 माण तालुक्यातील पिंगळीखुर्द व वडगाव येथील चारा छावणीस पालकमंत्र्यांनी भेट  दिली. यावेळी त्यांनी चारा छावणी चालकांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि चारा छावणीचालक उपस्थित होते.

 जिल्हाधिकाऱयांनी चारा छावणीस मंजूरी दिल्यानंतर प्रातांधिकाऱयांनी चारा छावण्या सुरु करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावेत. मंजूर चारा छावणी चालक जर चारा छावणी सुरु करण्यास प्रतिसाद देत नसेल तर त्याला लेखी पत्र द्यावे. छावणीतील जनावरांसाठी लांबून पाणी आणावे लागत असेल तर त्यांना जवळच्या पाण्याचे स्त्राsत उपलब्ध करुन द्यावेत. जिह्यातील सक्षम सहकारी बँका, साखर कारखाने, सक्षम पतसंस्था यांनी चारा छावणी सुरु करण्याबाबत पुढाकार घ्यावा. लवकरात लवकर मंजूर असलेल्या चारा छवण्या कशा सुरु होतील, यासाठी संबंधित अधिकाऱयांनी संवेदनशीलपणे काम करावे. आज मी चारा छावण्यात फिरलो असता महिलांच्या संख्या अधिक असल्याचे दिसून आले. या महिलांसाठी चारा छावणीमध्ये मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.