|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘टकाटक’चा ट्रेलर प्रदर्शित

‘टकाटक’चा ट्रेलर प्रदर्शित 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाचीच चर्चा रंगू लागली आहे.

‘येडय़ांची जत्रा’, ‘4 इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ असे एकापेक्षा एक करमणूकप्रधान चित्रपट बनवणाऱया मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी काही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱया पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे. समाजातील एखादा विषय गंमतीशीर शैलीत प्रेक्षकांसमोर मांडत त्यांना तो सहजपणे पटवून देण्याचा हातखंडा असणाऱया मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’मध्ये नेमके काय दाखवण्याचा प्रयत्न केला  त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

‘टकाटक’चा विषय तसा मराठी चित्रपटसफष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 100 टक्के शुद्ध विनोदांना प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लसपाईंट आहे. सेक्स कॉमेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे, तितकेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटात देण्यात आला आहे.

ओमप्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रवींद्र चौबे या निर्मात्यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका नव्या कोऱया जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही या चित्रपटात अनुभवायला मिळेल. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध पॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत.

Related posts: