|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हनिमनाळ येथे पंचकल्याण महामहोत्सवास प्रारंभ

हनिमनाळ येथे पंचकल्याण महामहोत्सवास प्रारंभ 

प्रतिनिधी/  संकेश्वर

हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथे भगवान आदिनाथ तीर्थंकार नूतन जीनमंदिर, शिखर व मानस्तंभोपरी चतुर्मुख जीनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवानिमित्त 20 ते 25 मे अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रथमाचार्य चारत्री चक्रवर्ती शांतीसागर मुनिमहाराज, संत शिरोमनी आचार्य विद्यासागर मुनिमहाराज, शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मतीसागरजी मुनिमहाराज, भट्टारकरत्न पट्टाचार्य लक्ष्मीसेन महास्वामीजी-कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य चंद्रप्रभूसागर महाराज व मुनिश्री सरलसागर महाराज यांच्या दिव्यसान्निध्यात कार्यक्रम पार पडणार आहे.

20 रोजी पहाटेपासून मंगल निनाद, मंगलवाद्य घोष, मंगलस्नान, गुरू आज्ञा, प्रतिष्ठाचार्य, इंद्र प्रतिष्ठा, घटयात्रा, ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, वेदीशुद्धी, जीनबिंब स्थापना, दीपस्थापना, व्रतबंधन, वास्तूशुद्धी, पीठ यंत्राराधना, अभिषेक, मंदिर मानस्तंब, वास्तू विधान, प्रवचन, सवाल, शास्त्र अंकुररोपण, ध्वजपट मिरवणूक, गर्भकल्याण पुर्वार्ध, इंद्रसभा, तत्वचर्चा व 16 स्वप्नदर्शन संगीत आरती आदी कार्यक्रम पार पडले.  21 रोजी पहाटे 5 वाजता मंगल निनाद, सकाळी 6 वाजता नित्यपूजन,  अभिषेक, यागमंडळ पूजन, धामसंप्रोक्षण, मंदिर मानस्तंब शुद्धी, सकाळी 10 वाजता भक्तामर विधान, दुपारी 12 वाजता महिला गर्भसंस्कार, यक्षनृत्य, दुपारी 3 वाजता आचार्य श्रींचे प्रवचन, सवाल, सायंकाळी 6 वाजता शास्त्र मिरवणूक, सायंकाळी 7 वाजता पंचकुंभविण्यास, रात्री 8 वाजता गर्भकल्याण उत्तारार्ध कुबेर रत्नवृष्टी, प्रश्नोत्तर होणार आहे.

22 रोजी यागमंडळ पूजन-गर्भकल्याणक अर्घ्य, सकाळी 8 ते 9 जन्मकल्याण विधी, 9 वाजता जलकुंभ मिरवणूक, 11 वाजता सर्वदोष प्रायश्चित विधान, दुपारी 2 वाजता मंगल प्रवचन, सवाल, दुपारी 4 वाजता जन्माभिषेक विधी, रात्री 7 वाजता नामकरण संस्कार व बालक्रीडा कार्यकम होणार आहे. 23 रोजी सकाळी 7 वाजता मौजीबंधन संस्कार, सकाळी 9 वाजता जलकुंभ मिरवणूक, दुपारी 1 वाजता राज्याभिषेक सोहळा व 56 देशाच्या राजांचे आगमन, नजराणा अर्पण, जातीस्मरण, लौकांतिका देवस्तूती, दुपारी 3 वाजता मंगल प्रवचन, रथोत्सव सवाल, सायंकाळी 5 ते 6 दिक्षाकल्याण विधी, सायंकाळी 6 वाजता शास्त्र मिरवणूक, सायंकाळी 7 वाजता जाप्य, सवाल, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आरती, रात्री 9 वाजता आईचे काळीज नाटक होणार आहे.

24 रोजी सकाळी 9 वाजता आदिसागर मुनिमहाराजांचा आहार विधी, सकाळी 11 वाजता केवलज्ञान संस्कार, मंत्रन्यास, दुपारी 12.35 ते 1.25 शुभलग्नावर मूर्ती प्रतिष्ठा, दुपारी 2 वाजता धर्मसभा, प्रवचन, सवाल, दुपारी 4 वाजता समवशरण सभा, दिव्यध्वनी प्रश्नोत्तर-केवलज्ञान, कल्याण पूजन अर्घ्य, सायंकाळी संगीत आरती व रथोत्सव कार्यक्रम होणार आहे.

25 रोजी पहाटे 5 वाजता सकाळी 8 ते 9 निर्वाणकल्याण-मोक्षकल्याण अर्घ्य,  दुपारी 1 वाजता संघपूजा, प्रवचन, दुपारी 3 वाजता 1008 कलश महाभिषेक, प्रतिष्ठाचार्य, इंद्रवर्ग, सत्कार, संगीत आरती, विसर्जन, कंकण विमोजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्री 8.30 वाजता आज की शाम शहिदोके नाम कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास श्रावक व श्राविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.