|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक्झिट पोल: येणार तर मोदीच

एक्झिट पोल: येणार तर मोदीच 

सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोल केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता. मतदानाच्या दिवशीच  मतदान करून आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिले हे विचारले जाते. मानसशास्त्र असे सांगते की, मतदानानंतर अर्धा तास मतदार मतदान कुणाला केले हे खरं खरं सांगण्याच्या मनःस्थितीत असतो. मतदान केंद्रावर  किती मतदार आहेत याची माहिती अगोदरच घेऊन ठरावीक मतदार केंदे निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने मतदान करून येणारा साधारण विसावा/पंचवीसावा मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचे विश्लेषण करून आकडेवारी निश्चित केली जाते. प्रत्येक मतदारसंघातले कोणते मतदान केंद्र निवडायचे हे सांख्यिकी पद्धतीनेच  ठरवले जाते.

मतदानापूर्वी सादर केला जातो तो ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते, तर मतदानानंतर होणाऱया मतदानोत्तर चाचणीला एक्झिट पोल म्हटले जाते.

मतदाराला त्याने कोणाला मत दिले असा प्रश्न विचारून त्या मतदाराचे लिंग, वय, शिक्षण, धर्म, जात, राहण्याचे ठिकाण यासारखी माहिती विचारून ती माहिती संकलित करणे म्हणजे एक्झिट पोल. ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण तो मतदानापूर्वी घेतला जातो. शिवाय वातावरण निर्मितीसाठी विविध पक्षांकडून मॅनेजही केला जातो. त्यामुळेच ओपिनियन पोल वास्तवापासून भरकटलेले पहायला मिळतात. तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो. या पोलचा मतदान झाले असल्याने मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी उपयोग नसल्याने कुठलाही राजकीय पक्ष मॅनेज करण्यासाठी खर्च करीत नाही. विविध वाहिन्या आपला टीआरपी वाढवण्यासाठी मात्र उपयोग करून बक्कळ पैसा कमवू शकतात.

भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात आला. विशेष म्हणजे याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केले होते. एका ठरावीक वारंवारतेने येणाऱया ठरावीक मतदाराला सांगितले जायचे, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारून घेतला जायचा. त्यावेळी ईव्हीएम्स नव्हती. अगोदर ज्याला मतदान केले, त्यालाच इथेही करा असे सांगितले जायचे. अशा पद्धतीने पहिला एक्झिट पोल केला गेला. इथेही ‘मतदानानंतर मतदार अर्धा तास खरे सांगण्याच्या मनस्थितीत असतो’ या गृहितकाचा उपयोग करण्यात आला होता.

नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी

15 फेब्रुवारी 1967 रोजी एक्झिट पोलची सुरुवात केली असे म्हटले जाते. अलीकडेच झालेल्या 5 राज्यातील निवडणुकीत एक्झिट पोलप्रमाणे साधारणपणे काँग्रेसची सरशी होईल असे अंदाज समोर आले होते. राजस्थानमध्ये बदल होऊन चांगल्या बहुमताने काँग्रेस जिंकणार, छत्तीसगडमध्ये भाजप, मध्य प्रदेश मध्ये त्रिशंकू परिस्थिती, तेलंगणमध्ये तेलंगणा राष्ट्रवादी समिती जिंकणार, तसेच मिझोराममध्ये काँग्रेस सत्ता गमावणार असे साधारण एक्झिट पोलचे अंदाज होते. मिझोराम आणि तेलंगणामध्ये हे अंदाज तंतोतंत बरोबर आल्याचे दिसले होते.

यापूर्वीचे एक्झिट पोल बऱयाच वेळा चुकलेले दिसतात, कारण सॅम्पल काही हजारात घेतले जात असत. यंदा ही संख्या लाखात आहे. देशातील मतदारांची 90 कोटी ही संख्या बघता कमीत कमी एक टक्के म्हटले तरी सॅम्पल 90 लाख मतदार होतात. देशातील सर्व एक्झिट पोलचे सॅम्पल एकत्र केले तरी ते 90 लाखापेक्षा खूपच कमी आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास एनडीए 300 च्या जवळपास जागा घेऊन सरकार बनवेल हे स्पष्ट होत आहे. यंदाचे एक्झिट पोलचे सॅम्पल यापूर्वीच्या सॅम्पलपेक्षा खूपच मोठे असल्याने यावेळच्या एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास जाणारे असतील असे वाटते.

2004 साली भाजपा आघाडीच परत सत्तेवर येणार असा सर्व महत्त्वाच्या एक्झिट पोल्सचा अंदाज होता, तो पूर्णपणे चूक ठरला होता. तसेच दिल्ली विधानसभेत  ’आप’ला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर यश मिळेल याचा अंदाज कुणालाही करता न आल्याने सर्वच एक्झिट पोल खोटे ठरले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांसंबंधीचे एक्झिट पोलचे अंदाजसुद्धा 2004 च्या बुश विरुद्ध केरी निवडणुकीत चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलने प्रेक्षकांची करमणूक, ज्यांच्या बाजूने आहेत त्यांना खुशी व वाहिन्यांची आर्थिक चांदी या गोष्टी घडतात हे मात्र नाकारता येणार नाही. आता नुकत्याच झालेल्या एक्झिट पोलचे विश्लेषण  करुयात. सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा 2014 पेक्षा वाढल्या तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न भंगणार हे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या आघाडीने भाजपासमोर चांगले आव्हान निर्माण केल्याचे दिसत असले तरी गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व कायम राहणार असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण केल्याचे एक्झिट पोलमधून समोर येते आहे.

प्रमुख एक्झिट पोलच्या अंदाजांची आकडेवारी काय सांगते?

टाइम्स नाऊ व्हीएमआर : एनडीए s 306, यूपीए-132, अन्यs104

इंडिया न्यूज s एनडीए- 298, यूपीए- 118, अन्य s 127

रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सी व्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

1) रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए-287, यूपीए s 128, अन्य s 127

2) रिपब्लिक टीव्ही s जन की बात: एनडीए- 305, यूपीए- 124, अन्य s 87

एनडीटीव्ही: एनडीए- 300, यूपीए- 127, अन्य s 115

आयएएनएस-सी व्होटर: भाजपा- 236, काँग्रेस s 80, एनडीए- 287

नेता- न्यूज एक्स: एनडीए- 242, यूपीए s 164, अन्य s 136

न्यूज 18 : एनडीए- 292- 312, यूपीए s 62- 72

एबीपी नेल्सन : एनडीएs 267, यूपीएs127, अन्य 148 (भाजपा 218, काँग्रेस 81

टुडेज चाणक्मय: एनडीए-350, यूपीए-95, अन्य 97 (भाजपा-300, काँग्रेस- 55)

न्यूज नेशन आणि रिपब्लिक या वाहिन्यांनी रेंज दिली असून अनुक्रमे एनडीला 282 ते 290 व 295 ते 315 तर युपीएला 118 ते 126 व 122 ते 125 असा अंदाज वर्तविला आहे.

केवळ दोन वाहिन्यांनुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे दिसते आहे. यापूर्वीच्या अनुभवानुसार टुडेज चाणक्मयचे अंदाज बऱयापैकी बरोबर येतात. त्यामुळेच मोदी-शहा म्हणतात त्याप्रमाणे भाजपा एकटय़ाच्या बळावर सरकार बनवू शकेल एवढय़ा जागा मिळवू शकेल असे वाटते. घोडामैदान दूर नाही, आज दुपारपर्यंत सारे चित्र स्पष्ट होईल अशी आशा करूया.

विलास पंढरी  – 9860613872