|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माधवराव बागल पुरस्कार कॉ. आनंद मेणसे यांना जाहीर

माधवराव बागल पुरस्कार कॉ. आनंद मेणसे यांना जाहीर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त भाई माधवराव बागल पुरस्कार बेळगाव येथील ज्येष्ठ विचारवंत कॉ. आनंद मेणसे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ऍड. अशोकराव साळोखे यांनी दिली.

ऍड. साळोखे म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांच्या 123 व्या जयंती मंगळवार 28 मे रोजी आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता शाहू मिल समोरील भाई माधवराव बागल यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. मंगळवार सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवन येथे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृती चिन्ह, पुष्पहार आणि रोख 5 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील आदी उपस्थित आहेत.