|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिक्षणाधिकारी लोहार यांना राष्ट्रीय पुरस्कार

शिक्षणाधिकारी लोहार यांना राष्ट्रीय पुरस्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ‘दि प्राईड ऑफ इंडिया-भास्कर ऍर्वार्ड 2019’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेने लोहार यांना पुरस्कार जाहीर केला आहे. दिनानाथ मंगेशकर कला अकादमी-पणजी, गोवा येथे 27 मे रोजी सकाळी 9.30 ते 1 या वेळेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र,शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिक्षणक्षेत्रातून कौतूक होत आहे.