|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » जीवी मोबाईल्सकडून फोन ते फोन चार्ज होणारे फिचर्स सादर

जीवी मोबाईल्सकडून फोन ते फोन चार्ज होणारे फिचर्स सादर 

एन-3720 फिचर्स असणारा मोबाईल सादर

नवी दिल्ली  

 जीवी मेबाईल्स यांच्याकडून एन-3720 या फोन ते फोन चार्जिगची सुविधा असणाऱया फोनचे सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या फोन्सचे चार्ज कमी वेळेत संपायला नकोत म्हणून आपण पॉवर बँक सोबत ठेवत असतो. परंतु या फोन्सच्या आधारे अन्य फोनसाठी चार्जिगची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

2.8 इंच डिस्प्ले असणाऱया फोनमध्ये तीन सिमकार्ड बसविण्याची सोय आहे. व 4000 एमएएचची बॅटरी ही पॉवर बँकसारखी दिली जाणार आहे. यातू अधिकची यूएसबी चार्जिगच्या आधारे दुसऱया फोनला चार्ज करता येण्याची सुविधा दिली जाणार आहे. यासोबतच जवळपास 1800 रुपयापर्यंत किंमत असणाऱया या हॅन्डसेन्टमध्ये मोठा एलईडी टॉर्च, एमपी3 आणि एमपी 4 प्लेअर, वायरलेस एफएम रेडिओ अशी अधिकची फिचर्स देण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.