|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तात वाढ

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तात वाढ 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

गुरुवारी 23 मे रोजी होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर मतमोजणी केंद्रांबरोबरच शहर व उपनगरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी बुधवारी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी यांच्या बरोबरच तीन एसीपी, 14 पोलीस निरीक्षक, 21 उपनिरीक्षक, 62 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 330 पोलीस, 50 गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तासाठी एकूण 500 हून अधिक बळ तैनात करण्यात आले आहे. राज्य राखीव दलाच्या तीन व शहर राखीव दलाच्या दोन तुकडय़ांबरोबरच केंद्रिय राखीव दलाच्या दोन तुकडय़ा बंदोबस्तासाठी जुंपण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर शहरातील वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमिवर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एक एसीपी, दोन पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व 100 वाहतूक पोलिसांना वाहतुक नियंत्रणासाठी जुंपण्यात आले आहे.