|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुरेश अंगडींचा विजयाचा चौकार

सुरेश अंगडींचा विजयाचा चौकार 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांनी विजयाचा चौकार ठोकला आहे. 3 लाख 91 हजार 304 इतक्मया विक्रमी मतांनी ते विजयी झाले. गुरुवारी रात्री 9 वाजता शेवटची 22 वी मतमोजणी फेरी झाली. त्यानंतर त्यांच्या मताधिक्क्मयावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी मात्र रात्री उशिरा निकाल जाहीर केला.

भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी यांना 7 लाख 61 हजार 991 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. व्ही. एस. साधुन्नावर यांना 3 लाख 70 हजार 687 मते मिळाली. याबरोबरच टपालाने आलेली सर्वाधिक 5,005 मतेही भाजपच्याच पारडय़ात आली आहेत. त्यामुळे विक्रमी मतांनी सुरेश अंगडी यांनी विजयाचा चौकार मारला.

23 एप्रिल रोजी कर्नाटकातील दुसऱया टप्प्यात बेळगावसाठी मतदान झाले. रिंगणात 56 उमेदवार होते. त्यामुळे भाजपची घोडदौड रोखणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, काँग्रेसने डॉ. व्ही. एस. साधुन्नावर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरेश अंगडी यांच्या आशा पल्लवित झाल्या. सलग दुसऱयांदा नरेंद्र मोदी लाटेवर स्वार होऊन त्यांनी चौकार मारला.

अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल व रामदुर्ग या आठ विधानसभा मतदारक्षेत्रांच्या कार्यक्षेत्रात 11 लाख 99 हजार 509 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 6 लाख 25 हजार 636 पुरुष व 5 लाख 73 हजार 869 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुरुवातीपासूनच सर्वच मतदारसंघात सुरेश अंगडी यांनी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली.

नकारात्मक मतांची संख्याही तीन हजारावर

या निवडणुकीत नकारात्मक मतांची संख्याही मोठी आहे. राष्ट्रीय पक्ष व स्वतंत्र उमेदवार मोठय़ा संख्येने रिंगणात होते. 3206 मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. अपक्ष उमेदवारांनीही 3 व 4 अंकांचा आकडा गाठला आहे. खासदार सुरेश अंगडी यांनी मात्र सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली.

पहिल्या फेरीतच सुरेश अंगडी यांना 42405 मते तर डॉ. साधुन्नावर यांना 19559 मते मिळाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत हे मताधिक्मय वाढत गेले. दुपारी दोननंतर त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यामुळे दुपारपासूनच आरपीडी क्रॉसवर गुलालाची उधळण व फटाक्मयांची आतषबाजी सुरू होती.

सुरेश अंगडी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लाटेवर पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रभावामुळे दुसऱयांदा त्यांनी विजयश्री मिळविली होती. आता नमोंच्या लाटेवर स्वार होऊन सलग दोन वेळा ते विजयी झाले आहेत. काँग्रेसमधील असंतोष व नमोंची लाट यामुळे या निवडणुकीत त्यांचे मताधिक्मय मोठय़ा प्रमाणात वाढले.

या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा चिकोडी येथे घेण्यात आली होती. बेळगाव लोकसभा मतदारसंघात सुरेश अंगडी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दौरा ठरला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी घातल्याने हा दौरा रद्द झाला होता. केवळ केंद्रीय मंत्री हर्षवर्धन राठोड व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांचा प्रचार केला होता.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी व त्यांचे बंधू माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील सत्तासंघर्षही सुरेश अंगडी यांचे मताधिक्मय वाढायला कारणीभूत ठरले. काँग्रेसचे उमेदवार डॉ. साधुन्नावर यांचा डोलारा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्य पातळीवर नेत्यांनीच सांभाळला. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली होती. तरीही बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. ते ज्या बैलहोंगलमध्ये राहतात तेथेही त्यांना मताधिक्मय मिळाले नाही. याबरोबरच बेळगाव ग्रामीण, गोकाक व बैलहोंगल या काँग्रेसच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघातही ते भाजपला रोखू शकले नाहीत. काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी मात्र आपला करिश्मा या निवडणुकीत दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

  2 व्या फेरीनंतर विजयी

गुरुवारी सकाळी 8.20 वाजता पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. रात्री 22 व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपचे सुरेश अंगडी हे विजयी ठरले. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्मय कायम होते. त्यामुळेच उमेदवार डॉ. साधुन्नावर वगळता काँग्रेसचे इतर कोणतेही नेते मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत.

अपक्ष उमेदवारांनीही घेतली 50 हजाराहून अधिक मते

या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आदी राष्ट्रीय पक्ष वगळता एकूण 57 उमेदवार रिंगणात होते. 48 अपक्ष उमेदवारांनी 50 हजाराच्यावर मते घेतल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत 55 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.

 

माझ्या विजयात सर्वपक्षीयांची मदत :  खासदार सुरेश अंगडी

आपला विजय होण्यासाठी सर्व पक्षीयांनी सहकार्य केले असून आपण सर्वांचेच आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश अंगडी यांनी विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली. जनतेने सहकार्य करून आणि भरघोस मतदान करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मोठी मदत केली आहे, असे सांगून त्यांनी आभार मानले. चौथ्यांदा खासदारपद मिळाले असल्याने मंत्रिपदाची दावेदारी करणार का? या प्रश्नावर पक्षाध्यक्ष अमित शहा यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.