|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » फेसबुककडून जानेवारी-मार्चमध्ये 2.2 अब्ज फेक खाती हटविलेत

फेसबुककडून जानेवारी-मार्चमध्ये 2.2 अब्ज फेक खाती हटविलेत 

फेसबुकच्या कम्युनिटी अहवालात माहिती सादर

वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया

फेसबुककडून मागील काही दिवस बनावट खाती काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कारण गेल्या वर्षातही युजर्सची वैयक्तिक माहिती लिंक करण्याचे आरोप फेसबुकवर केले होते. त्यावर कंपनीने आपले नियमात बदल करुन कठोर नियम लागू केलेत. यामुळे बनावट खात्यावर आळा घालण्यात येत आहे. सध्या जानेवारी-मार्च या तिमाहीच्या कालावधीत जवळपास 2.2 अब्ज बनावट फेसबुक खाती काढून टाकण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

सध्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती आहे या अगोदर ऑक्टोबर-डिसेंबर या काळात 1.2 अब्ज खाती काढण्यात आली होती. तर महिन्यांचे युजर्स हे 2.38 अब्ज इतक्या प्रमाणात असतानाही फेसबुकने 2.2 अब्ज खाती बाजूला केली आहेत.

फेसबुकच्या तिसऱया अहवालात माहिती

बनावट खात्यावर आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती फेसबुकच्या कम्युनिटी स्टॅन्डर्ड अहवालात सादर करण्यात आली आहे. हा अहवाल वर्षातून किमान चार वेळा सादर करण्यात येतो. असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे.

लहान कंपन्यांची विभागणीला ब्रेक

अशा समस्यावर बंधन लावण्यासाठी सोशल मिडीयासमोर खुप मोठी आव्हाने आहेत त्यातच कंपनीचा ब्रँण्ड मजबूत ठेवण्याचे धोरण महत्वाचे असून जुकेरबर्ग यांनी लहान लहान कंपन्यांना विभागून करण्यात येणाऱया योजनेला ब्रेक लावला जाणार असल्याचे म्हटले आहे. ….

हेट स्पीच ची सर्वात मोठी समस्या

हेट स्पीच यापासून सुटका मिळवण्यासाठी आता पर्यंत कंपनीने कोणत्याही प्रकारची योजना तयार केली नाही  कारण यांच्या आधारावर अपलोड होणाऱया माहितीवर नजर ठेवणे सोपे झाले असते. त्यासाठी पायलट प्रकल्प उभारण्याची गरज आहे. अशी माहिती फेसबुकचे उपाध्यक्ष जस्टिन ओसॉफस्की यांनी म्हटले आहे.