|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद 

स्टार प्रवाहवर बुद्धपौर्णिमेपासून सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. ‘महामानवाची गौरवगाथा’ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात मालिकेचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी ही मालिका एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून खास क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत या मालिकेचे प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले. स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरुनही प्रेक्षकांनी या मालिकेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया दिलखुलासपणे कळवल्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहोचतील, पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय, खूप शिकायला मिळतेय, अशा आशयाच्या या प्रतिक्रिया आहेत.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातले एक महान पर्व आहे. इतिहासाचे हे सोनेरी पान या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा उलगडण्यात येत आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महामानव होण्यापर्यंतचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात येतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.

Related posts: