|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

 पुणे / वार्ताहर :

लठ्ठपणामुळे सासरच्या लोकांकडून होणाऱया सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पिंपरी-चिंवचवड परिसरात घडला.

प्रियांका पेठकर (वय 32) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रियांकाचा भाऊ पुष्कराज प्रभुणे याने प्रियंकाचा पती केदार पेठकर, सासरा श्रीकांत पेठकर व सासू (सर्व रा. फलटण, सातारा) यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदार पेठकर हा शेतकरी आहे. 2015 मध्ये केदारचे भोसरीतील प्रियांका प्रभुणे या तरुणीशी लग्न झाले. लग्नानंतर प्रियांका सासरी गेली असता सुरुवातीला काही दिवस तिचा संसार व्यवस्थित सुरु होता. मात्र, त्यानंतर लठ्ठपणाच्या कारणावरुन तिचा शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यानंतर नैराश्यातून प्रियांकाने माहेरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related posts: