|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » किंमत घटविण्यासाठी जिओsची कर्मचारी कपात

किंमत घटविण्यासाठी जिओsची कर्मचारी कपात 

मुंबई

 रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांनी किमंत कमी करणार आहे. यामधूनच ऑपरेटिंग व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देण्यासाठी आपल्या कर्मचारी वर्गात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिगमध्ये घसरण झाल्याची नोंद केली होती. कंत्राट पद्धती-कायम असणारे कर्मचारी यांच्याही कपात करण्यात येणार असून यात पुरवठा साखळी, एचआर, फायनान्स, प्रशासकीय आणि अन्य नेटवर्क सांभाळणाऱया कर्मचाऱयांची कपात करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

5000 कर्मचारी कपातीचा अंदाज

कंपनीमधील कार्यरत असणारे 5000 विविध विभागातील कर्मचारी मिळून जवळपास 600 कर्मचारी कायमचे असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे. तर अन्य कर्मचारी यामध्ये कंत्राट पद्धतीवर असल्याचे सांगण्यात आले.  

31 टक्क्यांवर मार्केट शेअर

सप्टेंबर 2016मध्ये जिओने बाजारात प्रवेश केला आहे. त्याबरोबर स्वस्त नेटवर्क देत बाजारात मोठी ग्राहक जोडणी केली आहे. या आधारेच कंपनीने जवळपास 30.7 कोटी ग्राहक जोडण्यास मदत झाली. त्यामुळेच महसूल शेअर 31 टक्क्यांवर राहिला आहे.

मनुष्यबळ नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न

उत्पादनाची किंमत कमी ठेवण्यासाठी सदरची कर्मचारी कपात केली जात आहे. यामध्ये मॅनेजरची टीमचा असणारी संख्या कमी केली जाणार आहे. यासाठी प्रशासकीय, पुरवठा करणारी साखळी आणि फायनान्ससह एचआर या विभागावर यांचा ताण पडणार असल्याचे म्हटले आहे.

Related posts: