|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » धडपडय़ा सखाराम मास्तरांवर कारवाई झाली; पण..!

धडपडय़ा सखाराम मास्तरांवर कारवाई झाली; पण..! 

प्रतिनिधी/ सातारा

गतवर्षीच्या शिक्षक बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी शासनाच्या 27 फेब्रुवारी 2017 च्या जीआरला कोलत बदली करवून घेतली. आजही असे अनेक शिक्षक पहायला मिळतील. तब्बल एक वर्षाच्या घडामोडीनंतर बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कारवाईचा धडाकाच लावला. ‘चुकीला माफी नाही’, असे म्हणत त्यांनी वर्षभर रेंगाळत पडलेले प्रकरण निकालात काढले. मात्र, या करवाईवरून ही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कारवाईला उशीर का झाला?, बदली झालेल्या सर्वच शिक्षकांची क्रॉस तपासणी केली का?, असे ही प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. ‘तरुण भारत’ने सखाराम मास्तरांच्या धडपडीवर नजर ठेवली होती. कारवाई झाल्याने मात्र शिक्षकांनी यावर्षी धसका घेतला आहे.

   शिक्षक म्हणजे पिढी घडवणारा घटक मानला जातो. याच घटकांकडून चांगल्या शाळेच्या अपेक्षेने शासनाच्या जीआरचा सोयीचा अर्थ काढत संगणकावरून चुकीची माहिती भरून लाभ मिळवला होता. ज्या शिक्षकांनी तक्रारी केल्या, त्यांच्यावर तब्बल वर्षभराच्या घडामोडीनंतर कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी कारवाईचा धडाका लावला होता. ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी होत्या त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, शिपाई यांचा समावेश होता. गतवर्षीच्या बदली प्रक्रियेत ज्यांनी चुकीची माहिती भरली, त्यामध्ये ज्यांच्यावर तक्रार झाल्या तेच या कारवाईच्या कचाटय़ात सापडले. त्यातील काही शिक्षकांना यातून दिलासा मिळणार आहे. तो म्हणजे सहकारी संस्थेत जोडीदार कामाला असेल त्याच्या लाभबाबत अजून स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. तसेच जिह्यातील ज्यांनी-ज्यांनी गतवर्षीच्या बदली प्रक्रियेत लाभ घेतला. त्या सर्व शिक्षकांची क्रॉस तपासणी केली नाही, असेही काही शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे कारवाई झालेल्या 21 शिक्षक आणि नोटीस बजावलेल्या 17 जणांकडून या कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्याचे समजते.।़

यांच्यावर झाली कारवाई

फलटण तालुक्यातील वंदना खेडेकर, सीमा मदने, अविनाश जगताप, भारती शेळके, अनुराधा ठोंबरे, गौरी भोसले, दिगंबर जगताप, सूर्यकांत कदम, संतोष निंबाळकर, अशोक मोरे, विष्णू भोसले, शीतल डवरी, पांडुरंग निखळे, सुवर्णा पाठक, सुनीता कदम, अश्विनी जाधव, लता जगताप तर खटाव तालुक्यातील अंजली मगर, तेजस्विनी पवार, बबन डोईफोडे, सचिन गाढवे यांची वेतन वाढ रोखली गेली. तर राजाराम रणदिवे, केशव माने, पोपट लवांगरे, अशोक रणवरे, विजया झेंडे, संजय धुमाळ, आशा धुमाळ, विकास बाबर, अविनाश गायकवाड, संतोष बनकर, दत्तात्रय निकाळजे, वनिता शिंदे यांना दहा दिवसांत खुलासा मागितला आहे.।़

 

Related posts: