|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बंदी कालावधीत मासेमारी करणाऱया 7 बोटींवर कारवाई

बंदी कालावधीत मासेमारी करणाऱया 7 बोटींवर कारवाई 

प्रतिनिधी / रत्नागिरी :

जिह्यात 1 जूनपासून मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला असताना  देखील अवैधरित्या मासेमारी करणाऱया 7 नौकांवर मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून कारवाई करण्यात आल़ी यावेळी मत्स्य विभागाकडून 28 हजार 400 रूपयांची मासळी जप्त करण्यात आली आह़े या कारवाईमुळे अवैधरित्या मासेमारी करणाऱया मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये अतिफ हमिद मिरकर (ऱा मिरकरवाडा) यांच्या मोहम्मद सियाम या नौकेवर तसेच साजिद हसनमियाँ मिरकर (ऱा भाटकरवाडा) यांची गोवर्धन प्रसाद नौका, संजय रघुनाथ चव्हाण (ऱा साखरहेदवी गुहागर) यांची दशभूज लक्ष्मी गणेश नौका, विष्णू भाग्या डोर्लेकर (ऱा वळणेश्वर गुहागर) यांची पांडुरंग प्रसाद नौका, आत्माराम हरी वासावे (ऱा साखरीआगार, गुहागर) यांची पिंपळेश्वर सागर नौका, दिलीप राघोबा नाटेकर (ऱा नवानगर, गुहागर) यांची सर्वेश्वरी नौका तसेच मोहम्मद भाटकर (ऱा राजीवडा, रत्नागिरी) यांची मोहम्मद शयान आदी नौकांवर कारवाई करण्यात आली.

पावसाळ्य़ामध्ये समुद्र उधाणलेला असल्याने तसेच माशांचा असलेला प्रजनन काळ लक्षात घेता जून महिन्यापासून मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आह़े मात्र अद्याप पावसाला सुरूवात झाली नसल्याने काही मच्छिमारांकडून मासेमारी करण्यात येत आह़े याची गंभीर दखल घेत मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून बंदी मोडणाऱया मच्छिमारांवर कारवाईचा बगडा उगारला आह़े ही कारवाई मत्स्य आयुक्त आनंद पालव, परवाना अधिकारी तृप्ती जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार फरगुटकर, सुनील झापडेकर यांनी केल़ी

 

Related posts: