|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूला फोन

मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूला फोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टी 20 मुंबई लीग स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्याआधी खराब प्रदर्शन करण्यासाठी मुंबईच्या रणजी संघातील एका खेळाडूशी याबाबत संपर्क झाला होता. संबंधित खेळाडूनेच मुंबई क्रिकेट असोशिएशनला याबाबतची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

14 मे ते 26 मे 2019 दरम्यान टी 20 मुंबई लीग स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडला. वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी नॉर्थ मुंबई पँथर्स, आर्क्स अंधेरी, सोबो सुपरसॉनिक्स, आकाश टायगर्स हे चार संघ उपांत्यफेरीत पोहोचले होते. उपांत्यफेरीच्या सामन्याआधी मॅच फिक्सिंगच्या प्रयत्नांसाठी एका खेळाडूला फोन आला होता. मुंबई क्रिकेट असोशिएशन बीसीसीआच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला याची माहिती देणार आहे.