|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वायंगणी-कालावल खाडी पट्टय़ातील 17 रॅम्प उद्ध्वस्त

वायंगणी-कालावल खाडी पट्टय़ातील 17 रॅम्प उद्ध्वस्त 

प्रतिनिधी / मसुरे:

 महसूल विभागाने मंगळवारी धडक कारवाई करीत वायंगणी कालावल खाडी पट्टय़ातील वाळू उत्खननाची मुदत संपलेले एकूण 17 रॅम्प उद्धवस्त केले. महसूल विभागाच्या या कारवाईचे एकिकडे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र पहाटे वाळू माफियांकडून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत कालावल खाडी पट्टय़ातील ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 मालवण तालुक्मयातील कालावल आणि कर्ली खाडीपात्रात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत तेथील ग्रामस्थांच्या तक्रारी असून कालावल खाडीपात्रातील काही वाळू उपशाच्या परवान्याची मुदत ही 29 मे रोजी संपूनही  वायंगणी कालावल खाडी पट्टय़ातील बेकायदेशीर वाळू उत्खनन केले जात असल्याची तक्रार मसुरेतील ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी महसूल विभागाकडे केली होती. या तक्रारीनंतरही महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उत्खननाकडे कानाडोळा केला होता. याबाबत मसुरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे ठरविले होते. दोन दिवसांपूर्वीच मसुरकरनी वाळू माफियांकडून आपल्या जीवितास धोका असल्याची लेखी तक्रार मालवण तहसीलदार व पोलिसांत केली होती.

  बुधवारी आचरा मंडल अधिकारी मिलिंद पारकर, श्रावण मंडल अधिकारी एस. ए. पवार, हडी तलाठी अनिल राणे, वायंगणी तलाठी काळे तसेच हडी, वायंगणी तलाठी सजाचे दोन कर्मचारी यांच्या पथकाने बांदिवडे आणि वायंगणी-कालावल येथील वाळू उत्खननाची मुदत संपलेल्या रॅम्पवर बुलडोझर फिरविला. बांदिवडे येथील एक आणि वायंगणी कालावल येथील 17 रॅम्पवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. महसूल विभागाची धडक कारवाई सुरूच राहील, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी दिली.

Related posts: